(फोटो सौजन्य: Pinterest)
स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
कोरड्या केसांची वाढ
जर तुमचे केस आधी साॅफ्ट आणि चमकदार असतील आणि अचानक जर ते कोरडे होऊ लागले असतील तर त्याचे मूळ कारण हे ब्लिचिंग असू शकते. केसांना लावलेला रासायनिक कलर फक्त त्यांना रंगच देत नाही तर केसांच्या बाहेरील संरक्षण थराला देखील नुकसान पोहचवत असते. या थराला क्यूटिकल्स असे म्हणतात जे केसांना ओलसर, चमकदार आणि मुलायम ठेवत असते.
केस गळायला लागतात
केसांचे गळणे एक सामान्य गोष्ट आहे पण आपली केसं जर मोठ्या प्रमाणात गळू लागली असतील तर तुम्ही सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही केसांवर ब्लिचिंगचा वापर जर असाच सुरु ठेवला तर केसांचे आरोग्य आणखी खराब होऊ शकते.
केसांना पोषक घटक न मिळणे
हा तो टप्पा आहे जेव्हा केसांचे नुकसान झालेले असते. यापर्यंत ब्लीच केसांच्या कॉर्टेक्सपर्यंत पोहोचलेले असते ज्यामुळे केसांना ताकद आणि आकार देणारे प्रथिनेसारखे पोषक घटक विरघळू लागतात. यामुळे केसांची लवचिकता कमी होते आणि ते लगद्यासारखे दिसू लागतात.
चमक नाहीशी होणे
ब्लीचचा वापर अधिक प्रमाणात केल्याने केसांची चमक हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे केसांच्या बाह्य आवरणाला म्हणजेच क्युटिकल्सला नुकसान होते ज्यामुळे ते रखरखीत होऊ लागतात. ब्लिचिंगचा वापर केसांचा मुलायमपणा कमी करत असतो.
स्टाईलिंगचा परिणाम न होणे
जर तुम्ही केसांवर स्टाईल करण्याचा प्रयत्न करत असाल आणि ५ मिनिटांहून जास्त वेळ हेअरस्टाईल तुमच्या केसांवर टिकूण राहत नसेल तर हे केसांच्या डॅमेजचे लक्षण असू शकते. केस खराब झाल्याने केसांवर कोणतीही स्टाईल फार काळ टिकून राहत नाही.
रंग टिकत नाही
ब्लिचिंगचा अतिवापर केल्याने केसांवर हेअर कलर केसांवर जास्त काळ टिकून राहत नाही. ब्लिचिंगच्या वापराने क्यूटिकल्स पोकळ होतात ज्यामुळे दोन ते तीन वेळा केस धुतल्याने केसांवरचा सर्व रंग फिका होऊन जातो.
ब्लिच केलेल्या केसांची काळजी कशी घ्यावी?






