फोटो सौजन्य - Social Media
आजच्या अमावास्येच्या काळोख्या रात्री चंद्राचा प्रकाश नसला तरी एक ग्रह पृथ्वीच्या या काळभोर अवकाशी अंधारात स्वतः येणार आहे. हो! स्वतः शनी ग्रह, या काळोख्या रात्रीला प्रकाश देण्यासाठी आज २१ सप्टेंबर रोजी आकाशात विराज होणार आहेत. जर तुम्हाला उघड्या डोळ्यांनी शनी ग्रहाचे दर्शन घ्यायचे असेल तर ते आज शक्य आहे. पण गोष्ट अशी आहे की उघड्या डोळ्यांनी शनी ग्रह फक्त एक तेजस्वी तारा म्हणून दिसेल. जो लखलखत नसेल पण त्याचे तेज इतर ताऱ्यांना झुकवणारा असेल. अशी कोणती वस्तू आकाशात आज दिसली तर समजून जा तो साक्षात शनी ग्रह आहे.
परंतु, जर तुम्हाला शनी ग्रहाचे कड्यांचेही दर्शन घ्यायचे असेल तर टेन्शन नॉट! तुम्ही एखादी छोटी दुर्बिणीचा वापर करून त्या सहज पाहू शकता. मुळात, फक्त कडे नव्हे तर शनीचा चंद्रही शनीच्या शेजारून जाताना दिसेल. ही एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्हाला ऍस्ट्रॉनॉमी किंवा खगोलशास्त्रात रस आहे तर या संधीला गमवू नका. कारण ही संधी वारंवार येत नाही.
२१ सप्टेंबरच्या संध्याकाळी शनी ग्रह पृथ्वीच्या पूर्वेकडील दिशेने अस्त होईल. हळू हळू तो मध्यान्हावर येईल. अगदी मध्य रात्रीच्या सुमारास शनी ग्रह आपल्या डोईवर आला असेल आणि हीच ती वेळ! जेव्हा आपण कसल्याही अडथळ्याशिवाय शनी ग्रहाचे दर्शन घेऊ शकतो.
‘या’ कारणामुळे ही संधी आली चालून?
ग्रहांच्या ऑपोजीशनमुळे ही स्थिती आकाशात घडते. ग्रहांचा ऑपोजिशन म्हणजे अशी वेळ, जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि बाह्य ग्रह (मंगळ, गुरु, शनी, अरुण, वरुण) एका सरळ रेषेत असतात. या वेळी पृथ्वी मधोमध असते आणि ग्रह सूर्याच्या अगदी उलट दिशेला असतो. म्हणूनच तो ग्रह सूर्यास्ताच्या वेळी पूर्वेकडे उगवतो आणि सूर्योदयाच्या वेळी पश्चिमेकडे मावळतो. म्हणजेच तो पूर्ण रात्रभर आकाशात चमकत राहतो. ऑपोजिशनच्या वेळी ग्रह पृथ्वीच्या जवळ असल्याने तो नेहमीपेक्षा मोठा आणि अधिक तेजस्वी दिसतो. म्हणून बाह्य ग्रहांना उघड्या डोळ्यांनी पाहण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो.