फोटो सौजन्य - Social Media
केसर हा अत्यंत मौल्यवान आणि गुणकारी मसाला मानला जातो. आयुर्वेदात केसरला आरोग्यासाठी उपयुक्त ठरवले असून स्मरणशक्ती वाढवणे, त्वचेचे आरोग्य सुधारणे, ताणतणाव कमी करणे अशा अनेक फायद्यांचा उल्लेख आहे. मात्र केसरची लागवड आणि त्याची काढणी ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने केसर बाजारात महाग मिळतो. सध्या भारतात काश्मीरमधील केसर सर्वोत्तम मानला जातो आणि त्याची किंमत प्रतिकिलो ५ ते ६ लाख रुपयांपर्यंत जाते. जगातील सुमारे ९० टक्के केसर उत्पादन इराणमध्ये होते. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर घरच्या घरी केसर उगवता येतो, असा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्रामवरील myplantsmygarden या पेजवर राणी अंशू यांनी घरच्या घरी केसर यशस्वीपणे उगवल्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी सांगितलेली पद्धत सोपी, कमी खर्चिक आणि घरच्या घरी करता येण्यासारखी आहे.
केसर हा सॅफ्रन क्रोकस या फुलाच्या आतून मिळणारे अतिशय बारीक धागे असतात. हे धागे वाळवल्यानंतर केसर तयार होतो. हा पीक प्रामुख्याने थंड हवामानात चांगला वाढतो. म्हणूनच काश्मीर, अफगाणिस्तान, स्पेन, ग्रीस, इटली आणि मोरोक्को यांसारख्या भागांमध्ये केसरची लागवड केली जाते.
घरच्या घरी केसर उगवण्यासाठी फारशा गोष्टींची गरज नसते.
योग्य माहिती, संयम आणि काळजी घेतल्यास घरच्या घरी केसर उगवणे शक्य आहे. हे केवळ एक प्रयोग न राहता भविष्यात छोट्या प्रमाणात उत्पन्नाचाही स्रोत ठरू शकतो, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.






