फोटो सौजन्य: iStock
हल्ली हार्ट अटॅकचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आता फक्त जेष्ठांमध्येच नाही तर तरुणांमध्ये देखील हार्ट अटॅकच्या केसेस दिसत आहे. यामुळेच अनेकांमध्ये हार्ट अटॅकबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातही कित्येक जण पाहिल्या हार्ट अटॅकमधून वाचतात त्यामुळे ते नशीबवान ठरतात.
बऱ्याच वेळा हार्ट अटॅकनंतर रुग्णाच्या हार्टची शस्त्रक्रिया केली जाते. ज्यामध्ये अँजिओप्लास्टी, व्हॉल्व्ह दुरुस्ती आणि CABG सारख्या शस्त्रक्रिया केल्या जातात. हार्ट सर्जरीनंतर, रुग्ण अनेकदा त्यांच्याच काही निष्काळजीपणामुळे स्वतःसाठी समस्या निर्माण करतात, जे अनेक प्रकारे हानिकारक असू शकते. अशा परिस्थितीत, मेदांता हॉस्पिटलने सोशल मीडियावर हृदयरुग्णांसाठी काही महत्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत, जेणेकरून हार्ट सर्जरीनंतर हृदयाची योग्य काळजी घेता येईल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
सिगारेटच्या व्यसनातून मुक्त व्हायचं असेल तर आजपासूनच ‘या’ 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा
मेदांता हॉस्पिटलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की हृदयरोग्यांनी नियमितपणे त्यांचे हृदय गती, रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासावा. तुम्ही घरी बसून या गोष्टींचे रिडींग अगदी सहजपणे घेऊ शकता. यानंतर ते एका ठिकाणी लिहून ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला जास्त चढउतार दिसून येतील तेव्हा डॉक्टरांना नक्की संपर्क करा.
हार्ट सर्जरीतील जखमेची काळजी घेण्यात कोणतीही निष्काळजीपणा करू नये. कोणत्याही जखमेच्या किंवा दुखापतीच्या बाबतीतही खबरदारी घेतली पाहिजे. हा भाग पूर्णपणे स्वच्छ करा आणि कोरडा ठेवा. जर तुम्हाला जखमेच्या किंवा दुखापतीभोवती लालसरपणा, वेदना किंवा सूज दिसली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
हृदयरोग्यांनी त्यांच्या वजनाची योग्य काळजी घ्यावी. जर शरीरात सूज येत असेल किंवा अचानक वजन वाढल्याचे लक्षात आले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून ते टाळावे. ही पाणी साचण्याची लक्षणे देखील असू शकतात. म्हणून, तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे.
हार्ट सर्जरीनंतर रुग्णांनी आपल्या हृदयाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यामध्ये जीवनशैली, आहार आणि व्यायाम यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी ज्या गोष्टी खाण्यास मनाई केली आहे, त्या टाळा आणि ज्या गोष्टींचा सल्ला दिला आहे त्याचेच सेवन करा. तसेच जीवनशैलीतील बदल आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करा.
चांगले आरोग्य राखण्यासाठी, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे योग्य वेळी घ्या. यामुळे रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते आणि रक्त पातळ राहते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्य राहते आणि हार्ट अटॅकचा धोका खूप कमी होतो.






