जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा गरमागरम ओव्याच्या पानांची भजी
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली ओव्याची पाने आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. ओव्याच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म पोटात वाढलेली ऍसिडिटी किंवा पित्त कमी करतात. या पानांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओव्याच्या पानांना अतिशय सुंदर सुगंध येतो. या पानांचा वापर औषध म्हणून केला जातो. यासोबतच अनेक वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात. पावसाळ्यात सगळ्यांचं गरमागरम भजी खाण्याची इच्छा होते. कांदाभजीचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओव्याच्या पानांची भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ओव्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया ओव्याच्या पानांची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त घरी बनवा शिंगाड्याचे पिठाचे चविष्ट लाडू, नोट करून घ्या रेसिपी
चिकन, मटण खाऊन कंटाळा आलाय? मग घरी बनवा मसालेदार अंडा बिर्याणी