
नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी
Easy Food Recipe: सुट्टीच्या दिवशी सगळ्यांचं नाश्त्यामध्ये वेगवेगळे चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी नाश्त्यासाठी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. नाश्त्यात तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यास अपचनाच्या समस्या वाढून संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. त्यामुळे नाश्त्यात सहज पचन होणाऱ्या हेल्दी टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट ॲव्होकॅडो टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ॲव्होकॅडो टोस्ट चवीला अतिशय सुंदर लागते. पोटभर नाश्ता केल्यास शरीराला सुद्धा फायदे होतात. त्यामुळे सकाळच्या वेळी न चुकता नाश्ता करावा. ॲव्होकॅडोमध्ये आरोग्यदायी फॅट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया चांगली राहते. ॲव्होकॅडो खाल्ल्यास वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया ॲव्होकॅडो टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी