
पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
Food Recipe: दुपारच्या जेवणात लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काहींना काही टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. दुपारच्या जेवणात डाळभात, भाजी चपाती किंवा इतर तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही हलके आणि चविष्ट पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट बीट दहीभात बनवू शकता. प्रत्येक घरात आवडीने दहीभात खाल्ला जातो. दही सहज पचन होते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात दहीभात खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याला मॉडर्न टच देऊन तुम्ही बीट दही भात बनवू शकता. बीट शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बीट खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात लोह मिळते आणि रक्ताची कमतरता भासत नाही. लहान मुलं बीट खाण्याचा कंटाळा करतात, अशावेळी मुलांना या पद्धतीने बीटपासून बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)