सोप्या पद्धतीमध्ये स्वादिष्ट अन् पौष्टिक बीट सँडविच
सकाळच्या नाश्त्यासाठी सगळ्याच काहींना काही हेल्दी किंवा टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेकदा बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याचा कंटाळा आल्यानंतर घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही बीट सँडविच बनवू शकता. बीट आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे. दैनंदिन आहारात बीटचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता दूर होते. यामध्ये लोह, विटामिन सी आणि इतर पौष्टिक घटक देखील आढळून येतात. बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स, आयर्न आणि फोलेट इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीटचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात बीट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बीट सँडविच बनवण्यास चवीला अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट दडपे पोहे, नोट करून घ्या रेसिपी
Viral Recipe: गावरान स्टाईल रात्रीच्या जेवणाला बनवा टोमॅटोचा ठेचा; 10 मिनिटांतच तयार होते रेसिपी