सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट दडपे पोहे
सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. मात्र वाढलेले वजन आणि घाईगडबडीमुळे अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. वजन कमी करताना सकाळचा नाश्ता करणे टाळल्यास शरीरातील ऊर्जा कमी होऊन थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. याशिवाय शरीराला इतर गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये दडपे पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीचा वापर करून दडपे पोहे बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. याआधी तुम्ही दुधाचे किंवा ताकाचा वापर करून बनवलेले पोहे खाल्ले असतील पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दडपे पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे पोहे बनवताना अनेक पौष्टिक पदार्थांचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया दडपे पोहे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
मित्रा, हा तूच! ‘या’ समस्या असतील तर पनीर नको खात जाऊस; होईल भयंकर त्रास