Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरण भातासोबत लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये कडू कारल्यापासून बनवा झणझणीत ठेचा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला कारल्याच्या भाजीपासून झणझणीत ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या कारल्याचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2025 | 08:00 AM
वरण भातासोबत लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये कडू कारल्यापासून बनवा झणझणीत ठेचा

वरण भातासोबत लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये कडू कारल्यापासून बनवा झणझणीत ठेचा

Follow Us
Follow Us:

झणझणीत चवीचा ठेचा सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात कायमच ठेचा वाढला जातो. भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर किंवा कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन बोर झाल्यानंतर झणझणीत ठेचा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्ला जातो. यापूर्वी तुम्ही कायमच लसूण ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचा ठेचा खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला कारल्याच्या भाजीचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चवीला कडू असलेले कारलं खायला अनेकांना आवडत नाही. पण या भाजीमध्ये असलेले पोषक घटक शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कडू कारल्याचा रस किंवा भाजीचे सेवन केले जाते. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले कारलं चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया कारल्याचा ठेचा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप

साहित्य:

  • कारली
  • शेंगदाणे
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • कढीपत्ता
  • जिरं
  • लिंबाचा रस
Stuffed Capsicum Recipe: दुपारच्या जेवणात ‘या’ पद्धतीने बनवा भरलेली शिमला मिरची, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

कृती:

  • कारल्याचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कारली स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर दोन भाग करून आतील बिया काढा.
  • बारीक करून घेतलेल्या कारल्यानां मीठ लावून काहीवेळा तसेच ठेवा. यामुळे भाजीमधील कडूपणा कमी होईल आणि चव सुंदर लागेल.
  • तवा गरम करून त्यात कारली भाजा. त्यानंतर त्याच तव्यात शेंगदाणे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि जिरे घालून व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजा.
  • भाजून घेतलेले सर्व पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांडयात टाकून जाडसर बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेला ठेचा वाटीमध्ये काढून त्यात लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला झणझणीत कारल्याचा ठेचा. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make bitter gourd thecha at home simple food recipe bitter gourd thecha recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.