Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदा भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये न थापता बनवा कुरकुरीत कोबीची वडी, नोट करा रेसिपी

कोबीची भाजी खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कोबीची वडी बनवू शकता. कोबीची कुरकुरीत वडी लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील. जाणून घ्या कोबीची वडी बनवण्याचीव सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2025 | 10:22 AM
सोप्या पद्धतीमध्ये न थापता बनवा कुरकुरीत कोबीची वडी

सोप्या पद्धतीमध्ये न थापता बनवा कुरकुरीत कोबीची वडी

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या जेवणात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरून विकत आणलेला सामोसा, वडापाव, शेवपुरी किंवा इतर आवडीचे पदार्थ आणून खाल्ले जातात. मात्र नेहमी नेहमी बाहेर विकत मिळणारे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या चविष्ट आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला कोणतीही हानी पोहचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये न थापता कोबीची वडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कोबीची भाजी अनेकांना खायला आवडत नाही. कारण कोबीच्या वास घेतल्यानंतर भाजी खाण्यास नकार दिला जातो. मात्र कोबीच्या भाजीमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये कोबीची वडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

रविवार होईल आणखीनच स्पेशल! दुपारच्या जेवणात बनवा चमचमीत पनीर चीज टिक्की, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कोबी
  • तांदळाचे पीठ
  • मीठ
  • लाल तिखट
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • बेसन पीठ
  • कॉर्नफ्लॉवर
  • हळद
  • जिरं
सकाळचा नाश्ता होईल आणखीन चविष्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत टोमॅटो डोसा, वाचा रेसिपी

कृती:

  • कोबीची वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून किंवा किसून घ्या.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण, हिरवी मिरची, आलं आणि जिरं टाकून बारीक वाटून घ्या.
  • तयार करून घेतलेली पेस्ट कोबीच्या मिश्रणात टाकून मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात बेसन पीठ, तांदळाचे पीठ आणि आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण जास्त घट्ट झाल्यास त्यात गरजेनुसार पाणी घालून पीठ व्यवस्थित तयार करा.
  • ताटाला तेल लावून त्यावर कोबीचे मिश्रण उभे आकारात तयार करा आणि गरम टोपावर वाफवण्यासाठी ठेवा. कोबीच्या वडी वाफवल्यानंतर थंड करून घ्या.
  • सुरीच्या साह्याने तुकडे पडून कोबीची वडी तळून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कोबीची वडी.

Web Title: How to make cabbage vadi at home simple food recipe cooking tips cabbage vadi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.