
Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही 'वेलचीचे पाणी', फायदे ऐकाल तर रोजच प्याल
सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!
गोडाच्या पदार्थांना चव देण्यासाठी वापरली जाणारी वेलची केवळ चव आणि सुगंधच देत नाही तर याचे सेवन आरोग्यासाठी वरदान देखील ठरते. आयुर्वेदात वेलचीला नैसर्गिक औषध मानलं गेलं आहे. याचे सेवन अनेक आजारांपासून आपले संरक्षण करते. जर रोज सकाळी उठून तुम्ही वेलचीच्या पाण्याचे सेवन केले तर याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतील. हे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यापासून ते पचन सुधारणे, वजन कमी करणे आणि सौंदर्य वाढवण्यास मदत करते.
पचनक्रिया मजबूत होते
रिकाम्या पोटी वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्याने गॅस, आम्लपित्त, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. याचे सेवन पाचक एंजाइम सक्रिय करते आणि अन्न अधिक सहजपणे पचवण्यास मदत करते.
शरीराला डिटॉक्स करते
खाल्लेल्या अन्नातील विषारी घटक आपल्या शरीरात साठून राहतात, ज्यांना बाहेर काढणे गरजेचे असते. वेलचीचे पाणी यात आपली मदत करते. रोज सकाळी वेलचीने पाणी पिल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे किडनी आणि लिव्हरही निरोगी राहते. हे रक्त शुद्ध करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळवून देते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
हे मेटाबाॅलिजम वाढवते आणि नैसर्गिकरित्या चरबी जाळण्यास प्रोत्साहन देते. यामुळे अधिक काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
वेलचीचे पाणी रक्तदाब नियंत्रित करते आणि कोलेस्ट्राॅलची पातळी संतुळित करते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
साखरेची पातळी नियंत्रित करते
मधुमेहाच्या रुग्णांसाठी वेलचीचे पाणी अत्यंत फायद्याचे आहे. यातील पोषक घटक रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्यास मदत करते.
त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवते
वेलचीचे पाणी त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही फायद्याचेही ठरते. यामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि केस मजबूत होण्यास मदत मिळते.
ताण आणि थकवा दूर करा
वेलचीची सुगंध मनाला शांत करतो. रोज सकाळी वेलचीचे पाणी प्यायल्याने ताण कमी होण्यास मदत होते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा भरुन राहते.
श्वसनाच्या समस्यांपासून आराम
वेलचीचे पाणी श्वसनसंस्थेला स्वच्छ करते आणि खोकला, सर्दी किंवा दमा यासारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करते.
वेलची पाणी कसे बनवायचे?