मासिक पाळीतील रक्त चेहऱ्याला लावणे योग्य की अयोग्य? चमकदार त्वचेसाठी फॉलो केला जाणारा भयानक ट्रेंड
मासिक पाळीतील रक्त त्वचेसाठी फायदेशीर आहे का?
मासिक पाळीच्या रक्तात आढळून येणारे विषाणू?
मून मास्किंग म्हणजे काय?
मासिक पाळी येणं हा महिलांच्या शरीरात होणारा नैसर्गिक बदल आहे. महिन्यातील चार ते पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. पाळी आल्यानंतर गर्भाशयाच्या अस्तरातून रक्तस्त्राव होतो. शरीरातील ही प्रक्रिया वयाच्या 12-15 व्या वर्षी सुरू होते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक महिलेला शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. कंबर दुखणे, ओटीपोटात वेदना होणे, पोटदुखी, मूड बदलणे, मळमळ आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसू लागतात. पण काहीवेळा मासिक पाळीच्या वेदनांमुळे महिला खूप जास्त त्रासल्या जातात. हल्ली स्किन केअरसंबंधित अनेक नवनवीन ट्रेंड सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर स्किन केअर किंवा हेअर केअर पाहिल्यानंतर महिलांसह पुरुष देखील ते करून पाहतात. यामुळे काहीवेळा फायदा होतो तर काहीवेळा त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. असाच एक धक्कादायक ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या नव्या ट्रेंडची जगभरात सगळीकडे मोठी चर्चा रंगली आहे. यामध्ये महिलेने मासिक पाळीतील रक्त आपल्या चेहऱ्यावर फेसपॅक म्हणून लावले आहे. काहींच्या मासिक पाळीतील रक्त त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार आणि सुंदर, तरुण आणि पिंपल-फ्री होते, असे अनेकांचे मत आहे. पाळीच्या रक्तात असलेले घटक पोषणद्रव्ये, स्टेम सेल्स आणि विटामिन त्वचेला नैसर्गिक तेज देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीतील रक्त त्वचेवर लावणे योग्य की अयोग्य? यामुळे त्वचेला फायदे होतात आणि नुकसान ? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मासिक पाळीच्या रक्ताचा फेसपॅक त्वचेला लावणे खरंच योग्य आहे का? जाणून घेऊया सविस्तर.
मासिक पाळी आल्यानंतर शरीरातील रक्त बाहेर पडून जाते. हे रक्त त्वचेला लावलेले जाते. त्वचेवर फेसपॅकप्रमाणे रक्त लावून काहीवेळा तसेच ठेवावे. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाकावी. याला मून मास्किंग असे म्हणतात. मासिक पाळीतील रक्तात पोषणद्रव्ये झिंक, लोह आणि अगदी स्टेम सेल्स यांसाखरे अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग किंवा सुरकुत्या कमी होतात, असे अनेकांना वाटते. पण मासिक पाळीतील रक्त त्वचेला लावणे अयोग्य आहे. यामुळे त्वचेसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
मासिक पाळीतील रक्त अशुद्ध असते. रक्त निर्जंतुक केलेले नसल्यामुळे त्वचेला लावणे धोक्याचे ठरू शकते. हे रक्त योनीमार्गातून बाहेर पडते. योनीमार्गातील आणि गुदद्वाराजवळ ई.कोलाय आणि कॅन्डिडा, मायक्रोऑर्गॅनिझम, रक्तामधील मृत पेशी, बॅक्टेरिया,लॅक्टोबॅसिलाय यांसारखे अनेक गंभीर विषाणू असतात. गंभीर विषाणू त्वचा किंवा डोळ्यांमध्ये गेल्यानंतर आरोग्यासंबंधित घातक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. ज्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा, पुरळ किंवा सूज येऊन त्वचा पूर्णपणे खराब होईल. मासिक पाळीच्या रक्तातील विषारी घटक संवेदनशील त्वचा असलेला महिलांसाठी घातक ठरतील. कारण यामुळे त्वचा लाल होणे, त्वचेमध्ये तीव्र जळजळ इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
Ans: गर्भधारणेसाठी शरीर दर महिन्याला गर्भाशयाचे अस्तर तयार करते. गर्भधारणा न झाल्यास, हे अस्तर रक्त आणि पेशींच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते, ज्याला मासिक पाळी म्हणतात.
Ans: मासिक पाळी, फॉलिक्युलर फेज, ओव्हुलेशन (अंडं बाहेर पडणे), आणि ल्यूटियल फेज हे मासिक पाळीचे प्रमुख टप्पे आहेत.
Ans: मासिक पाळीचे रक्त त्वचेवर लावले जाते.






