
लहान मुलांच्या पार्टीसाठी बनवा रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा, पदार्थ पाहतच क्षणी मुलं होतील खुश
लहान मुलांना पिझ्झा खायला खूप जास्त आवडतो. कोणत्याही कॅफेमध्ये गेल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुलं कायमच पिझ्झा ऑर्डर करतात. पण नेहमीच मैद्याचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेला पिझ्झा खावा. कारण मैदा खाल्ल्यामुळे अपचनाच्या समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मिक्स फळांचा पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. फळांचा पिझ्झा लहान मुलांच्या पार्टीसाठी किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता. बऱ्याचदा लहान मुलांसह मोठे सुद्धा फळे खाण्याचा कंटाळा करतात. अशावेळी मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने फळे खाण्यास देऊ शकता. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. उन्हाळयाच्या दिवसांमध्ये पाणीदार फळांचे खूप जास्त प्रमाणात सेवन करावे. लहान मुलांची पार्टी ठेवल्यानंतर स्नॅक्समध्ये कोणते पदार्थ बनवावे, बऱ्याचदा सगळ्यांचं हा प्रश्न पडतो. अशावेळी मिक्स फळांचा पिझ्झा अतिशय उत्तम आहे. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. चला तर जाणून घेऊया रंगेबेरंगी फळांचा पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)