कोथिंबीरीचे देठ फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट कोथिंबीर चटणी
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कोथिंबीरीचा वापर केला जातो. कोथिंबीर जेवणात टाकल्यानंतर पदार्थाची चव अतिशय सुंदर आणि चवदार लागते. भाजी, डाळ, पुलाव किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवताना कोथिंबीरीची वापर केला जातो.२ दिवस लागणारी कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ करून ठेवली जाते. कोथिंबीर स्वच्छ करताना फक्त कोथिंबिरीची पाने घेतली जातात आणि देठ फेकून दिले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोथिंबीरीचे देठ फेकून न देता या देठांपासून चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कोथिंबिरीच्या पानांसोबतच कोथिंबीरीचे देठ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. कोथिंबिरीच्या देठांची चटणी तुम्ही कोणत्याही पदार्थांसोबत किंवा जेवणात तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया कोथिंबिरीच्या देठाची चविष्ट चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक उकड्या तांदळाची पेज, आरोग्यासाठी ठरेल अतिशय प्रभावी