
लहान मुलांना खाऊच्या डब्यासाठी झटपट बनवून द्या क्रिमी चॉकलेट सँडविच
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप आवडते. चॉकलेटचं नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय चॉकलेट खाणे आरोग्यासाठी गुणकारी आहे. चॉकलेटमध्ये असलेले घटक शरीरात निरोगी पेशी तयार करतात. मात्र अतिप्रमाणात चॉकलेट खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. बऱ्याचदा लहान मुलांना डब्यात नेमकं काय खायला द्यावं? असे अनेक प्रश्न पालकांना सतत पडतात. अशावेळी तुम्ही मुलांसाठी क्रिमी चॉकलेट सँडविच बनवून देऊ शकता. कारण लहान मुलांचा वीकपॉइंट म्हणजे चॉकलेट. डब्यात मुलांना नेहमीच चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलं काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास मागतात. अशावेळी मुलांना चॉकलेट सँडविच बनवून देणे उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया क्रिमी चॉकलेट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यातील थंडगार वातावरणात झटपट बनवा हिरव्या मुगाचं कढण, नोट करा पारंपरिक पदार्थ