पावसाळ्यातील थंडगार वातावरणात झटपट बनवा हिरव्या मुगाचं कढण
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते.त्यामध्ये प्रामुख्याने गरमागरम कांदाभजी,वडापाव आणि चहा कॉफी प्यायली जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कारण बाहेरील विकत मिळणारे पदार्थ खाल्यामुळे पोट बिघडणे, जुलाब, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चवदार पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरव्या मुगाचा वापर करून कढण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मोड आलेले कडधान्य आरोग्यासाठी अतिशय प्रभावी असतात. हिरवे मूग खाल्यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते. आजार पडल्यानंतर किंवा उपवासाच्या दिवशी मुगाचे कढण प्यायले जाते. चला तर जाणून घेऊया मुगाचे कढण बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)