Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साध्या डोसाला द्या हेल्दी ट्विस्ट! वाटीभर मुगाचा वापर करून बनवा टेस्टी कुरकुरीत पनीर स्टफ्ड डोसा, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हिरव्या मुगाचा पनीर स्टफ्ड डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा डोसा चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2026 | 08:00 AM
वाटीभर मुगाचा वापर करून बनवा टेस्टी कुरकुरीत पनीर स्टफ्ड डोसा, नोट करा रेसिपी

वाटीभर मुगाचा वापर करून बनवा टेस्टी कुरकुरीत पनीर स्टफ्ड डोसा, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतीय पदार्थ केवळ भारतामध्येच नाहीतर जगभरात फेमस आहेत. तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवलेला डोसा किंवा इडली, त्यासोबत बनवले जाणारे सांबार आणि खोबऱ्याची चटणी हे कॉम्बिनेशन सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. डोसा, मसाला डोसा, इडली, मेदुवडा किंवा इतर ठराविक पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी तुम्ही वाटीभर हिरव्या मुगाचा वापर करून चमचमीत स्टफ्ड डोसा बनवू शकता. हिरवे मूग शरीराला भरपूर पोषण देतात. वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी मुगाचा पनीर घालून बनवलेला डोसा बनवू शकता. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. नाश्त्यासाठी सगळ्यांचं काहींना काही नवीन पदार्थ हवे असतात. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा तुम्ही मुगाचा स्टफ्ड डोसा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

स्ट्रीट फूड खाण्याची खूप जास्त इच्छा झाली आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पनीर टिक्का काठी रोल्स

साहित्य:

  • हिरवे मूग
  • तांदूळ
  • शेंगदाणे
  • हिरवी मिरची
  • मेथी दाणे
  • लसूण
  • मीठ
  • शिमला मिरची
  • कांदा
  • गाजर
  • पनीर
  • तेल
टिपिकल बटाटा- टोमॅटो सँडविच खाऊन कंटाळा आला? मग इंटरनेटवर नव्याने व्हायरल होत असलेले Japanese Fruit Sandwich नक्की बनवा

कृती:

  • स्टफ्ड डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये हिरवे मूग आणि तांदूळ ५ ते ६ तासांसाठी भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून स्वच्छ धुवून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मूग, तांदूळ, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण घट्टसर वाटून घ्या.
  • वाटीमध्ये किसून घेतलेला गाजर, शिमला मिरची, बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, किसलेले पनीर आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर एकसमान सगळीकडे तेल लावा. तेल कडक गरम झाल्यानंतर त्यावर मुगाचे मिश्रण गोलाकार पसरवून त्यावर तयार केलेले पनीरचे मिश्रण ठेवून डोसा फोल्ड करा.
  • डोसा व्यवस्थित भाजल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मुगाचा स्टफ्ड डोसा. हा डोसा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make crispy paneer stuffed dosa at home benefits of eating green moong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.