Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात कायमच साबुदाणा खिचडी बनवली जाते. पण उपाशी पोटी साबुदाणा खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास वाढतो. त्यामुळे नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात दही बटाटा बनवून खावा. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2026 | 08:00 AM
उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वच महिला उपवास करतात. उपवासाच्या दिवशी घरात साबुदाणा खिचडी, वडा, भगर किंवा इतर पदार्थ खाल्ले जातात. पण उपाशी पोटी साबुदाणा खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवास केल्यानंतर आहारात साबुदाणे अजिबात खाऊ नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही बटाटा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला दही बटाटा चवीला अतिशय सुंदर लागतो. दही खाल्ल्यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि बटाटा खाल्ल्यामुळे पोट भरते, लवकर खाण्याची इच्छा होत नाही. उपवास केल्यानंतर नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात कोणतेही तेलकट पदार्थ खाऊ नये. चिप्स किंवा बटाट्याचे पापड खाल्ल्यामुळे ऍसिडिटी वाढते. त्यामुळे दही बटाटा खाणे फायदेशीर ठरेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • बटाटा
  • दही
  • हिरवी मिरची
  • शेंगदाण्याचा कूट
  • तूप
  • काळ मीठ
  • साखर
  • कोथिंबीर
श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

कृती:

  • दही बटाटा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुतलेले बटाटे, गरजेनुसार पाणी आणि मीठ टाकून कुकरच्या ३ शिट्या काढा.
  • शिजवलेले बटाटे थंड झाल्यानंतर साल काढून मध्यम आकारात तुकडे करा. बटाटे जास्त बारीक कापू नये.
  • कढईमध्ये तूप गरम करून घ्या. गरम तुपात जिरं आणि हिरवी मिरची भाजून घ्या. त्यानंतर त्यात शिजवलेले बटाटे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • बटाटा छान सोनेरी झाल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, सेंधव मीठ आणि साखर घालून मंद आचेवर काहीवेळ तसेच ठेवा.
  • त्यानंतर गॅस बंद करून बटाटा हलकासा थंड करा आणि फेटून घेतलेले दही घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर गॅस चालू करून एक वाफ काढून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला उपवासासाठी दही बटाटा.

Web Title: How to make curd potato at home simple fasting recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
1

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
2

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
4

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.