१० मिनिटांमध्ये जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कढीपत्त्याच्या पानांची चविष्ट चटणी
जेवणात तोंडी लावण्यासाठी नेहमीच काहींना काही पदार्थ बनवले जातात. कधी पापड तर कधी लोणचं, चटणी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही कढीपत्त्याची चविष्ट चटणी बनवू शकता. कढीपत्ता खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जेवणात डाळ, भाजी किंवा इतर पदार्थ बनवताना कढीपत्त्याचा वापर केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते. याशिवाय कढीपत्त्याच्या सुगंधामुळे जेवणाची चव आणखीनच वाढते. लहान मुलांना कढीपत्त्याची पाने खायला आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही मुलांना कढीपत्त्याची चटणी बनवून देऊ शकता. कढीपत्त्याची चटणी तुम्ही भाकरी, चपाती किंवा जेवणात डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)