संध्याकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी sprouts chat
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा सतत काहींना काही करत असतात. आहारात बदल करणे, जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे, प्रोटीनशेक इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र आहारात कोणत्याही पदार्थांचे आणि प्रोटीनशेकचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. प्रोटीनशेक पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. यामुळे किडनीला इजा होण्याची जास्त शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात कडधान्य किंवा चाटचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्प्राउट्स चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यामध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तसेच संध्याकाळच्या नाश्त्यात चाट खाल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया स्प्राउट्स चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसह मोठ्यांसाठी झटपट बनवा बन डोसा, नोट करून घ्या रेसिपी
Father’s Day 2025: आपल्या वडिलांसाठी काही खास करा, घरी बनवा सोपा आणि टेस्टी रवा केक