शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपात्यांपासून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा दाबेली रॅप
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात, नाश्त्यात नेहमी पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. नेहमीच नाश्त्यात कांदापोहे, शिरा किंवा उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून दाबेली रॅप बनवू शकता. मुबईतील प्रत्येक रस्त्यावर दाबेली हा पदार्थ मिळतोच. आपल्यातील अनेकांना दाबेली खायला खूप आवडते. चिंच-गूळाची चटणी, शेव, कांदा, डाळिंब इत्यादी पदार्थाचामसाला तयार करून पावामध्ये भरला जातो. त्यानंतर पाव बटर मध्ये गरम करून सर्व्ह केला जातो. मात्र रोजच्या आहारात पाव खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे पावाचा वापर न करता तुम्ही चपाती वापरून दाबेली रॅप बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दाबेली रॅप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
पारंपरिक पद्धतीमध्ये झटपट बनवा झणझणीत कांदा लसूण मसाला, जेवणाला येईल चटकदार चव