
मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर होईल गायब! सकाळच्या नाश्त्यात नियमित प्या गाजर स्मूदी
वजन वाढणे ही सामान्य समस्या आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे झपाट्याने वजन वाढते. मांड्या, हात, पोट आणि शरीराच्या इतर अवयवांवर चरबीचे थर जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर आरोग्य हळूहळू बिघडू लागते. मांड्यांवर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे चालताना किंवा वर उठताना खूप जास्त त्रास होतो. तसेच काहीवेळा वजन वाढल्यामुळे महिलांची आत्मविश्वास कमी होऊन जातो. अनावश्यक फॅट वाढल्यानंतर महागडा डाएट, तासनतास व्यायाम, सप्लिमेंट्स इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा अंगावर वाढलेला चरबीचा घेर कमी होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात गाजर स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गाजर स्मूदी चवीला अतिशय सुंदर लागते. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे नियमित महिनाभर गाजर स्मूदी प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल. चला तर जाणून घेऊया गाजर स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
Winter Special Recipe: हिवाळ्यात घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट पंजाबी स्टाईल ‘आलू पराठे’