नाश्त्यामध्ये बनवा चमचमीत दलिया आप्प्पे
सकाळच्या वेळी नाश्ता करणे आरोग्यदायी सवय आहे. कारण सकाळी पोटभर नाश्ता केल्यानंतर शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नाश्ता करण्यास प्राधान्य द्यावे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस छान आनंददायी जातो. नाश्त्यामध्ये घरी अनेकदा उपमा, शिरा, पोहे किंवा साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. पण सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही नाश्तामध्ये दलिया आप्पे बनवू शकता. हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. दलियापासून इतर वेगवेगळे पदार्थासुद्धा बनवले जातात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी दलियाचे सेवन केले जाते. आरोग्याच्या दृष्टीने दलिया खाल्यामुळे वजन नियंत्रणात राहून लवकर भूक लागत नाही. शिवाय, यामध्ये अनेक जीवनसत्वे आणि पोषक घटक आढळून येतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फोलेट, पोटॅशियम, कार्बोहाइट्रेड, झिंक, मिनिरल्स, विटॅमिन्स, आयर्न, प्रोटीन, फाइबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया दलिया आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सकाळच्या वेळी कोणती फळं खावी जाणून घ्या
हे देखील वाचा: मेथी आणि कढीपत्ता एकत्र खाल्ल्याने काय होते