
१५ मिनिटांमध्ये शेवग्याच्या शेंगांपासून बनवा चटकदार लोणचं
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. या शेवग्याचे नियमित सेवन केल्यास तुम्ही कायमच निरोगी राहाल. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, अमीनो ॲसिड आणि आवश्यक खनिजे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यापूर्वी तुम्ही कैरीचे लोणचं, लिंबाचे लोणचं, मिरचीचं लोणचं इत्यादी अनेक वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेले लोणचं खाल्ले असतील पण आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या भाजीपासून सूप, भाजी, पराठा, थालीपीठ इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांनी आहारात शेवग्याच्या शेंगाचे किंवा शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. यामुळे हाडे मजबूत राहतात, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून आराम मिळतो.(फोटो सौजन्य – pinterest)
शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया कायमच निरोगी राहते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास गॅस, बद्धकोष्ठता, आम्लता आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवणार नाही. यामध्ये असलेल्या विटामिन सी आणि अँटीऑक्सिंडट्समुळे रोगप्रतिकारशक्ती कायमच निरोगी राहते. साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा खाव्यात. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगांचे लोणचं बनवण्याची सोपी कृती.
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा विष्ट ‘पनीर डोसा’, शरीरात दीर्घकाळ टिकून राहील ऊर्जा