लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत मसाला टिक्की पाव
लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा शाळेच्या डब्यासाठी कायमच चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा चहा बिस्कीट खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. मुलांना बाहेर विकत मिळणारे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण कायमच तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चचमीत मसाला पाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसाला पाव आणि वडापाव हे दोन्ही पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात.पण याच दोन्ही पदार्थांचे कॉम्बिनेशन करून तुम्ही टिक्की असलेला मसाला पाव सुद्धा बनवू शकता. लहान मुलांना शाळेत पाठ्वण्याआधी पोटभर नाश्ता द्यावा. कारण नाश्ता केल्यामुळे आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात आणि शरीर कायमच निरोगी राहते. नाश्ता केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घ्या चमचमीत मसाला पाव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
५ मिनिटांमध्ये हिरव्यागार मिरच्यांपासून बनवा चटपटीत झणझणीत लोणचं, वरण भाताला येईल रंगतदार चव
दिवसाची सुरुवात होईल आनंदी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ताकातलं धिरडं, नोट करून घ्या रेसिपी






