चमचाभर बडीशेप आणि खडीसाखरचे वापर करून उन्हाळ्यात बनवा थंडगार सरबत
उन्हाळा ऋतू कोणालाच आवडत नाही. कारण या दिवसांमध्ये कडक उन्हामुळे सतत घाम येणे, डिहायड्रेशनची समस्या उद्भवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी शरीर थंड करण्यासाठी कोल्डड्रिंक, आईस्क्रीम, सरबत अशा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक प्यायले जातात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पेयांचे सेवन करावे, ज्यामुळे उष्णता कमी होऊन आराम मिळेल. उन्हाळा सुरु झाल्यानंतर अनेकांच्या घरी कैरीचे पन्ह, कैरीचे सरबत, कोकम सरबत इत्यादी पेय बनवली जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला चमचाभर बडीशेप आणि खडीसाखरेचा वापर करून थंडगार सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बाहेर फिरून आल्यानंतर किंवा इतर वेळी घरी असताना तुम्ही बडीशेपचे सरबत बनवून पिऊ शकता. जाणून घेऊया बडीशेप खडीसाखरेचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
ऑफिसच्या डब्यासाठी ‘या’ पद्धतीने बनवा चमचमीत भेंडी फ्राय, लहान मुलं आवडीने खातील भाजी