
जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना गवार खायला अजिबात आवडत नाही. गवार पाहिल्यानंतर मुलं लगेच नाक मुरडतात. मुलांना कायमच विकतचे चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. शाळेच्या डब्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्याच वेळी चमचमीत आणि तिखट पदार्थ खाण्यास हवे असतात. पण नेहमीच तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. रोजच्या आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अस्सल गावरान पद्धतीमध्ये गवार ठेचा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. गवारपासून बनवलेला झणझणीत ठेचा तोंडाची चव वाढवण्यास मदत करेल. गरमागरम भाकरी किंवा वाफाळत्या भातडाळीसोबत ठेचा अतिशय सुंदर लागतो. गवारपासून बनवलेला ठेचा भाजी न आवडणारे लोक सुद्धा अतिशय आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’