ओव्हन आणि साखरचा कणभर वापर न करता झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी चॉकलेट, नोट करून घ्या रेसिपी
घरातील सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. घरात चॉकलेट बनवायचं म्हंटल की ओव्हन, चॉकलेट साचा, साखर इत्यादी अनेक गोष्टी लागतात. याशिवाय खूप जास्त पसारा सुद्धा होतो, त्यामुळे चॉकलेट बनवण्याची अजिबात इच्छा होत नाही. लहान मुलांना चॉकलेट हवे असल्यास ते कायम विकत आणून दिले जाते. पण नेहमीच विकतचे चॉकलेट खाण्याऐवजी घरी बनवलेले चॉकलेट खावे. आज आम्ही तुम्हाला ५ मिनिटांमध्ये स्ट्रॉबेरी चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात स्ट्रॉबेरी आणि इतर वेगवेगळी फळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. काहींना नुसतीच फळे खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही फळांपासून चॉकलेट बनवून खाऊ शकता. स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या नैसर्गिक गोडव्यामुळे चॉकलेट तयार करताना त्यात साखर टाकण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही. साखर न घालता बनवलेले स्ट्रॉबेरी चॉकलेट लहान मुलांसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही स्ट्रॉबेरी चॉकलेटचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






