जॅकी श्रॉफने सांगितली झटपट तयार होणारी कांदा भेंडीची चविष्ट भाजी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं भेंडीची भाजी खायला खूप आवडते. भेंडीच्या भाजीमध्ये शरीरासाठी आवश्यक पोषक घटकसुद्धा आढळून येतात. त्यामुळे आहारात तुम्ही भेंडीच्या भाजीचे सेवन करू शकता. पण काहींना भेंडीच्या गुळगुळीत पणामुळे भेंडी खायला आवडत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितलेली कांदा भेंडीची चविष्ट भाजी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांना भेंडीची भाजी खायला खूप आवडते. हाडांच्या आरोग्यासाठी भेंडीची भाजी अतिशय पौष्टिक आहे. हाडांमधील वेदना किंवा सूज कमी करण्यासाठी आहारात भेंडी खावी. याशिवाय सकाळी उठल्यानंतर भेंडीचे पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पचनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात भेंडीची भाजी खावी. चला तर जाणून घेऊया कांदा भेंडीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)