सोप्या पद्धतीमध्ये बनवा लिंबू पुदिन्याचे सरबत
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पुदिन्याच्या पानांचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. पुदिन्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. कारण पुदिना खाल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरात थंडावा निर्माण होतो. पुदिन्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात. राज्यभरात सगळीकडे लवकर उन्हाळा ऋतूला सुरुवात होणार आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू आणि पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. लिंबामध्ये असलेले विटामिन सी शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीर ताजेतवाने आणि थंडगार ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये लिंबू पुदिन्याचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सरबत तुम्ही बाहेर जाताना किंवा इतर वेळी घरी असल्यानंतर पिऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
पास्ता लव्हर्ससाठी खास! आता बनवून पहा रेस्टॉरंट स्टाईल पिंक सॉस पास्ता, झटपट रेसिपी