महाशिवरात्रीच्या उपवासात दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी बनवा सुकामेवा सॅलड
यंदाच्या वर्षी 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्री उत्सव राज्यासह देशभरात मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केली जाते. शिवाय अनेक महिला या दिवशी उपवास करतात. तसेच शंकराला बेल, दूध इत्यादी पदार्थ अर्पण केले जातात. उपवास केल्यानंतर फळे, साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. तर अनेक महिला उपवासाच्या दिवशी जास्त पदार्थ खाणे टाळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासात सुकामेवा सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सुकामेवा खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहत. याशिवाय या पदार्थाचे सेवन केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. चला तर जाणून घेऊया सुकामेवा सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
पास्ता लव्हर्ससाठी खास! आता बनवून पहा रेस्टॉरंट स्टाईल पिंक सॉस पास्ता, झटपट रेसिपी