सकाळच्या डब्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिश्र भाज्यांचे सँडविच
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी नेमकं काय बनवावं? सुचत नाही. अनेक घरांमध्ये नाश्त्यासाठी कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मिश्र भाज्यांचे सँडविच बनवू शकता. सँडविच बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात सँडविच तयार होते. लहान मुलांसह मोठ्यांना भाज्या खायला आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही मुलांना किंवा घरातील इतरांना सँडविच बनवून खाण्यासाठी देऊ शकता. भाज्या खाल्यामुळे शरीराला आवश्यक कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन मिळण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी किंवा इतर समस्यांनी त्रस्त असलेलं रुग्ण सुद्धा सकाळच्या नाश्त्यासाठी भाज्यांपासून तयार केलेले सँडविच खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये मिश्र भाज्यांचे सँडविच बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा