
हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सकाळच्या नाश्त्यात बनवा Mixed vegetable soup
नाश्त्यामध्ये नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक बाहेरून विकत आणलेला डोसा, इडली किंवा इतर तिखट पदार्थ खातात. मात्र सतत त्याच पदार्थांचे सेवन करून कंटाळा आल्यानंतर तुम्ही नाश्त्यामध्ये मिक्स भाज्यांचे सूप बनवू शकता. भाज्यांचे सूप नियमित प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात. भाज्यांमध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर पोषक घटक शरीराचे कार्य सुधारतात. वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून बनवलेले सूप शरीराला ऊर्जा देतं. भाज्यांचे झेप पिऊन कामाला किंवा इतर वेळी बाहेर गेल्यास शरीरात ऊर्जा कायम टिकून राहील. मिक्स भाज्यांचे सूप तुम्ही लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खाण्यासाठी देऊ शकता. चला तर जाणून घेऊया मिक्स भाज्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
ताज्या द्राक्षांपासून मनुके कसे तयार करायचे? फार सोपी आहे पद्धत; आजच जाणून घ्या