Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक मुगाच्या डाळीचा पराठा,आरोग्याला होतील भरभरून फायदे

लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा डब्यासाठी नेमकं काय खाण्यास द्यावं? हा प्रश्न पालकांना नेहमीच पडतो. अशावेळी तुम्ही मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा डब्यात मुगाच्या डाळीचा पराठा बनवून देऊ शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 04, 2025 | 11:21 AM
लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक मुगाच्या डाळीचा पराठा

लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक मुगाच्या डाळीचा पराठा

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात डाळींचे सेवन केले जातात. ताटामध्ये भातावर जर डाळ नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. शिवाय डाळींचा वापर करून वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन करावे, यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तूरडाळ, मुगडाळ, मसूरडाळ, उडीद डाळ इत्यादी डाळींचा वापर करून जेवणातील पदार्थ बनवले जातात. शिवाय या डाळींमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि इतर घटक आढळून येतात. त्यातील सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाणारी डाळ म्हणजे मूग डाळ. मुगाच्या डाळीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. मुगाच्या डाळीमध्ये प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, विटामिन बी-६, नियासिन, थायामिन आणि फोलेट इत्यादी अनेक घटक आढळून येतात. (फोटो सौजन्य – iStock) 

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

फायबर युक्त मुगाच्या डाळीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. शिवाय ही डाळ पचनास अतिशय हलकी असते. त्यामुळे दैनंदिन आहारात आणि लहान मुलांच्या जेवणातील पदार्थांमध्ये या डाळीचा वापर केला जातो.पण अनेकदा लहान मुलं डाळ खाण्यास कंटाळा करतात. अशावेळी तुम्ही मुलांना सोप्या पद्धतीमध्ये मुगाच्या डाळीचा पराठा बनवून देऊ शकता. मुगाच्या डाळीमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • मुगाची डाळ
  • गव्हाचं पीठ
  • हळद
  • मीठ
  • तेल
  • काळे तीळ
  • ओवा
  • जिरं
  • तूप
  • पाणी
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • मुगाच्या डाळीचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मुगाची डाळ स्वच्छ करून पाण्याने ४ वेळा धुवून घ्या.
  • धुतलेली डाळ कुकरमध्ये टाकून त्यात मुगाची डाळ, हळद, चवीनुसार मीठ घालून पाणी टाका आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्या.
  • ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात काळे तीळ, जिरे, ओवा, हिंग, तेल टाकून थंड करून मॅश केलेली मुगाची डाळ मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पिठाला तेल लावून काहीवेळ बाजूला ठेवा.
  • पिठाचे छोटे छोटे गोळे करून पराठे लाटून घ्या आणि तव्यावर भाजण्यासाठी टाका.
  • पराठा दोन्ही बाजूने भाजल्यानंतर वरून तूप लावून लहान मुलांच्या डब्यात द्या.
  • तयार आहे सोप्या पध्यतीमध्ये बनवलेला मुगाच्या डाळीचा पराठा.

Web Title: How to make moong dal paratha at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 11:20 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe
  • moong dal

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.