Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Mushroom Kabab Recipe : मशरुमपासून तुम्ही फक्त भाजीच नाही तर लज्जतदार चवीचे मशरुम कबाब देखील तयार करु शकता. हे कबाब व्हेज स्टार्टर म्हणून एक चांगला पर्याय ठरतील आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस पडतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 01, 2026 | 10:10 AM
Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • कबाब हे व्हेज-नॉनव्हेज दोन्ही प्रकारे बनवता येतात.
  • तुम्ही अनेक चिकन कबाब, पनीर कबाब तर अनेकदा खाल्ले असतील.
  • पण मशरुम कबाब कधी ट्राय केलेत का? याची रेसिपी फार सोपी आहे.
संध्याकाळच्या चहासोबत नेहमीचे भजी, वडा किंवा कटलेट खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळे करून पाहा. कबाब तर तुम्ही अनेकदा खाल्ले असतील पण आज आपण मशरूम कबाबची एक टेस्टी रेसिपी जाणून घेणार आहोत. मशरूमपासून तयार केलेले हे  कबाब चवीला मसालेदार, बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात. घरच्या घरी कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ संध्याकाळच्या स्नॅकसाठी एक चांगला पर्याय ठरतो. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. चला नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

 साहित्य

  • मोठी वेलची – २
  • छोटी वेलची – ६
  • लवंग – ५
  • दालचिनी – १ इंच तुकडा
  • जावित्री – १
  • जायफळ – ¼ तुकडा
  • काळी मिरी – १०
  • जिरे – १ चमचा
  • धणे – १ मोठा चमचा
  • बडीशेप – ½ चमचा
  • चक्रफूल – ½ तुकडा
  • सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या – १ मोठा चमचा
इतर साहित्य
  • मशरूम – ४०० ग्रॅम
  • कांदे – ३
  • काजू – ३० ग्रॅम
  • आले – २ इंच
  • लसूण – ३ ते ४ पाकळ्या
  • बेसन – २ ते ४ मोठे चमचे
  • लाल तिखट – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तूप किंवा तेल – कबाब भाजण्यासाठी
Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

कृती

  • सर्व सुके मसाले एका पॅनमध्ये घ्या आणि मंद आचेवर हलके भाजून घ्या. मसाल्यांचा सुगंध येऊ लागल्यावर गॅस बंद करा. मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  • पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले आले, लसूण आणि काजू घाला. मध्यम आचेवर साधारण २ ते ३ मिनिटे परतून घ्या.
  • आता त्यात चिरलेला कांदा घाला आणि कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परता. त्यानंतर स्वच्छ करून चिरलेले मशरूम घाला. मशरूममधील अतिरिक्त पाणी आटून ते व्यवस्थित शिजेपर्यंत परतून घ्या.
  • शिजलेले मशरूमचे मिश्रण थोडे थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरमध्ये घालून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.
    तयार पेस्टमध्ये बेसन, भाजून तयार केलेला कबाब मसाला, लाल तिखट आणि मीठ घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.
  • हे मिश्रण पॅनमध्ये घेऊन मध्यम आचेवर काही वेळ परतून घ्या, जेणेकरून त्यातील ओलावा कमी होऊन मिश्रण घट्ट होईल आणि सहज आकार देता येईल.
  • मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताला हलके तेल लावून त्याच्या छोट्या गोल किंवा चपट्या टिक्की तयार करा. सर्व मिश्रणापासून अशाच प्रकारे कबाब बनवून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर थोडे तूप किंवा तेल सोडा. तयार कबाब तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • शेवटी तयार गरमागरम मशरूम कबाब हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Web Title: How to make mushroom kabab at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
1

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
2

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
3

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
4

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.