
सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Paneer Sandwich
सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे ही सवय शरीरासाठी आरोग्यदायी मानली जाते. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. पण कामाच्या धावपळीमध्ये काहीजण नाश्ता करणे विसरून जातात तर बऱ्याचदा नाश्ता करण्यासाठी वेळ मिळत नाही. पण असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे फार अवश्यक आहे. नाश्त्यात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात झटपट तयार होणारे पनीर सँडविच बनवून नक्कीच खावे. पनीर खाल्ल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. लहान मुलांसह मोठेसुद्धा भाज्या खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी मुलांना या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ बनवून खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)