१० मिनिटांमध्ये घरी बनवा आंबट गोड कैरीचे चविष्ट पापड चाट
संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं छोटी मोठी भूक लागते. ऑफीमधून थकून घरी आल्यानंतर नेमकं काय खावं? हे अनेकदा सुचत नाही. नेहमीच बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पचनास हलके आणि चविष्ट पदार्थ खावे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चाट खायला खूप आवडतं. चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर सगळ्यात आधी चाट खाल्ले जाते. पापड चाट, चणा चाट किंवा इतर पदार्थांपासून बनवलेले चाट खूप जास्त प्रसिद्ध आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला कैरी घालून बनवलेले चविष्ट पापड चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कच्ची कैरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे घरी चाट बनवताना तुम्ही त्यात कैरीचा वापर करू शकता. जाणून घ्या कैरी पापडाचे चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळचा नाश्ता होईल आणखीन चविष्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत टोमॅटो डोसा, वाचा रेसिपी