सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग झटपट बनवा Peanut butter toast, नोट करा रेसिपी
धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा सकाळचा नाश्ता करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी नाश्ता बाहेरून विकत आणून खाल्ला जातो. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही नवीन पदार्थ हवा असतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पीनट बटर टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते. याशिवाय घाईच्या वेळी तुम्ही पीनट बटर टोस्ट लहान मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. पीनट बटर टोस्ट चवीला अतिशय सुंदर लागतो. लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा पीनट बटर टोस्ट खायला खूप जास्त आवडेल. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने झाल्यास संपूर्ण दिवस आनंदात जाईल. शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवणार नाही. चला तर जाणून घेऊया पीनट बटर टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)