लहान मुलांसाठी घरीच बनवा चविष्ट हेल्दी पोहा नगेट्स
लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात सतत कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलं विकतचे पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण नेहमीच विकतचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले ठरत नाही. बाहेर मिळणारे चटपटीत पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागले तरीसुद्धा या पदार्थांच्या सेवनामुळे मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात पोहा नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पोहे चवीला अतिशय सुंदर लागतात. याशिवाय पोहे सहज पचन देखील होतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात मुलांना कधीतरी पोहे सुद्धा खाण्यास द्यावे. बऱ्याचदा तुम्ही बाजारात विकत मिळणारे चिकन नगेट्स खाल्ले असतील, पण आम्ही तुम्हाला पोह्यांपासून नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कृती.(फोटो सौजन्य – istock)