पीठ न आंबवता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीच्या पिठाची इडली
सकाळच्या नाश्त्यात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कधी इडली, डोसा तर कधी कांदापोहे, उपमा, शिरा बनवला जातो. पण नेहमीच काही ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं? सुचत नाही. साऊथ इंडियन पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. हे पदार्थ बनवण्यासाठी तांदूळ डाळीचे पीठ आंबवावे लागते. तांदळाचे पीठ व्यवस्थित आंबवल्याशिवाय इडली किंवा डोसा व्यवस्थित येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १५ मिनिटांमध्ये नाचणीच्या पिठाची इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणीचे पीठ आंबवण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये झटपट नाचणीच्या पिठाच्या इडली बनवू शकता. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर फिरायला जाताना इडली हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. नाचणी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. कारण यामध्ये असलेल्या कॅल्शियम, विटामिन आणि इतर खनिजांमुळे आरोग्य सुधारते. जाणून घ्या नाचणीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
१५ मिनिटांमध्ये घरातील लहान मुलांसाठी झटपट बनवा गूळ-ज्वारीचा पौष्टिक केक, विकतपेक्षा लागेल चविष्ट
कृती:
नाचणीच्या पिठाची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये नाचणीचे पीठ, मीठ आणि रवा घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या.
त्यानंतर तयार केलेले मिश्रण चमच्याने मिक्स करा. नंतर त्यात दही टाकून मिक्स करा.
इडली बनवताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून तयार केलेले इडलीचे मिश्रण काहीवेळ बाजूला ठेवा.
इडलीच्या पिठात इनो किंवा खाण्याचा सोडा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. ज्यामुळे इडलीचे पीठ फुलेल.
इडली पात्राला तेल लावून घ्या. त्यानंतर त्यावर तयार केलेले मिश्रण टाकून १० ते १५ मिनिटं इडली मंद आचेवर वाफवण्यासाठी ठेवा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली नाचणीच्या पिठाची इडली. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.