वरण भातासोबत हिरव्यागार कच्च्या कैरीचा बनवा आंबटगोड झणझणीत ठेचा
एप्रिल महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे कच्च्या कैऱ्या, पिकलेले आंबे, रानमेवा बाजारात उपलब्ध असतो. कैरीचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.कैरीची चवीला अतिशय आंबटगोड लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैरीचा वापर करून कैरीची आमटी, चटणी, मुरंबा, कैरीचे लोणचं इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात.मी कैरीचा वापर माश्यांच्या जेवणात देखील केला जातो. जेवणात तोंडी लावण्यासाठी कैरीचे सेवन केले जाते. डाळ भात किंवा भाकरी बनवल्यानंतर तुम्ही कैरीची चटणी किंवा कैरीचा ठेचा खाऊ शकता. नेहमीच कैरीची चटणी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही कैरीचा ठेचा बनवू शकता. कैरीचा ठेवा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट कोणता पदार्थ हवा असेल तर कैरीचा ठेचा बनवू शकता. हा ठेचा आठवडाभर सहज टिकतो. जाणून घ्या कैरीचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पॅटीस पाव, वाचा रेसिपी
5 मिनिटांतच तयार होईल कांद्याची ही स्पेशल भाजी; त्वरित नोट करा रेसिपी