ताज्या गाजरांपासून बनवा चमचमीत लोणचे, नोट करून घ्या रेसिपी
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप जास्त आवडते. लोणचं म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण. कारण काही जेवणाच्या ताटात भाजी नसली तरी चालते पण आंबट गोड चवीचे लोणचं मात्र हवे असते. बाजारात अनेक वेगवेगळ्या पदार्थापासून बनवलेले लोणचं उपलब्ध आहेत. कैरीचे लोणचं, मिरची लोणचं, लसूण, आवळा, बीट इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून लोणचं बनवले जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गाजर लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. गाजरपासून हलवा किंवा इतर अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गाजरपासून बनवलेले पदार्थ चावीलाच नाहीतर शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. लोणचं तुम्ही भाकरी, डाळभात, चपाती किंवा पराठासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया गाजर लोणचं बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)






