वीकेंडला १५ मिनिटांमध्ये बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
सुट्टीच्या दिवशी प्रत्येकाला काहींना काही चटपटीत आणि चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. कायमच चिकन, मटण पासून बनवलेले पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तंदूर पनीर टिक्का बनवून खाऊ शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. बऱ्याचदा तंदूर बनवण्यासाठी घरात ओव्हन उपलब्ध नसतो. अशावेळी तंदूर बाहेरून विकत आणले जाते. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले चविष्ट पदार्थ खावेत. विकतचे पदार्थ बनवताना त्यात शिळ्या पनीरचा किंवा वारंवार गरम केलेल्या तेलाचा वापर केला जातो. सतत गरम केलेले तेल जेवणासाठी वापरल्यास चव खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कोणताही पदार्थ बनवताना फ्रेश तेलाचा वापर करावा. तंदूर पनीर तुम्ही स्टार्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया तंदूर पनीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






