संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता हवा आहे, मग उरलेल्या पोळ्यांपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग बाकरवडी
संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून घरी आल्यानंतर सगळ्यांचं खूप भूक लागते. अशावेळी चहासोबत बिस्कीट किंवा टोस्ट बटर खाल्ले जातात. नेहमी नेहमी बाहेरील विकतचे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही पौष्टिक आणि घरगुती पदार्थ खाण्याची इच्छा होते.अशावेळी तुम्ही उरलेल्या पोळ्यांपासून बाकरवडी बनवू शकता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बाकरवडी हा पदार्थ खूप जास्त आवडतो. प्रत्येक घरात दुपारच्या जेवणात बनवलेल्या पोळ्या उरलेल्या असतात. मात्र अनेकांना उरलेल्या चपात्या खायला आवडत नाही. या चपात्या फेकून देण्याऐवजी त्यापासून तुम्ही पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ बनवू शकता. चपातीपासून उपमा किंवा फोडणीची चपाती इत्यादी ठरविक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला उरलेल्या पोळ्यांपासून बाकरवडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरीच बनवा थंडगार मटका कुल्फी, पोटभर घ्या थंड पदार्थ खाण्याचा आनंद