गुढी पाडवा सणासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा साखरेच्या गाठी
गुढी पाडवा सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठा आनंद आणि उत्साह व्यक्त केला जातो. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होते. गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वच घरांमध्ये गुढी उभारली जाते. बाबूच्या काठीला साडीचे वस्र्त लावून त्यावर तांब्याचा कलश लावून हार, कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, झेंडूचा हार आणि साखरेची गाठी लावून पूजा केली जाते. या दिवशी कडुलिंब आणि साखरेचे गाठीला विशेष महत्व आहे. याशिवाय बाजारात वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेली साखरेची गाठी तुम्ही देखील पहिली असेल. मात्र याच गाठी तुम्ही विकत आणण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये साखरेच्या गाठी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
५ मिनिटांमध्ये उन्हाळ्यासाठी बनवा थंडगार आंबट-गोड-तिखट कैरीचे सरबत, शरीरात कायम राहील थंडावा
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिजी कॉर्न, चहासोबत लागेल सुंदर चव