Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत शेवग्याच्या शेंगांचे भरीत, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

शेवग्याच्या शेंगा खाण्याचा कंटाळा येतो. मग सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही झटपट शेवग्याच्या शेंगांचे भरीत बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 03, 2026 | 08:00 AM
गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत शेवग्याच्या शेंगांचे भरीत, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत शेवग्याच्या शेंगांचे भरीत, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

Follow Us
Follow Us:

आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या शेंगाना विशेष महत्व देण्यात आले आहे. शेवग्याच्या शेंगांचे आहारात नियमित सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि हाडे मजबूत राहण्यास मदत होईल. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि मिनरल्स इत्यादी आवश्यक खनिजे आढळून येतात. या शेंगा चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. वाढत्या वयात महिलांनी कायमच फिट आणि तरुण राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. शेवग्याच्या शेंगांपासून कायमच भाजी किंवा आमटी बनवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला झणझणीत भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले भरीत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत शेवग्याचे भरीत अतिशय चविष्ट लागेल. बऱ्याचदा लहान मुलांसह मोठेसुद्धा शेवग्याच्या शेंगा खाण्याचा कंटाळा करतात. अशावेळी तुम्ही मुलांना या पद्धतीने भरीत बनवून खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Special Recipe : पोटाला मिळेल आराम, घरी बनवा काकडी-पुदिन्याचा रायता

साहित्य:

  • शेवग्याच्या शेंगा
  • तेल
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • लाल सुक्या मिरच्या
  • कांदा
  • टोमॅटो
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • मीठ
उन्हाळ्यातील चविष्ट पदार्थ! अस्सल कोकणी पद्धतीमध्ये बनवा ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा खसवस, नोट करा रेसिपी

कृती:

  • शेवग्याच्या शेंगांचे भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम, मध्यम आकारात शेंगांचे तुकडे कापून घ्या. त्यानंतर त्यांच्या वरील साल काढा.
  • कुकरच्या भांड्यात पाणी आणि शेंगा घालून ३ किंवा ४ शिट्ट्या काढून शेंगा शिजवून घ्या. शेंगा शिजल्यानंतर थंड करून त्यातील गर वेगळा करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात शेवग्याच्या शेंगांचा गर गरम करून घ्या. त्यानंतर त्याच पॅनमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, कांदा, टोमॅटो घालून खमंग भाजा.
  • मोठ्या खलबत्यामध्ये किंवा वाटीमध्ये शेवग्याच्या शेंगांचा गर, भाजलेले सर्व साहित्य, चवीनुसार मीठ घालून बारीक करून घ्या. हलक्या हाताने दाब दिल्यास सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होईल.
  • तयार केलेले भरीत वाटीमध्ये काढून वरून त्यावर बारीक केलेली कोथिंबीर आणि कच्चा कांदा घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले शेवग्याच्या शेंगाचे भरीत.

Web Title: How to make shevgyachya shengancha bharit at home simple food recipe moringa recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.