कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी झटपट बनवा सोलकढी
कोकणात उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये सोलकढी हे पेय आवडीने प्यायले जाते. सोलकढी हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. उन्हाळयात सोलकढी प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. कोकमपासून बनवलेली सोलकढी शरीराला थंडावा देते. दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जेवण केल्यानंतर सोलकढी प्यायल्यास जेवलेले अन्न व्यवस्थित पचन होते. याशिवाय बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सोलकढी पिऊ शकता. सोलकढी बनवण्यासाठी कोकम आणि खोबऱ्याच्या रसाचा वापर केला जातो. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर सोलकढी प्यायल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होईल आणि शरीर थंड राहील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कोकमचा वापर करून सोलकढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने सोलकढी बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
यंदाच्या वाळवणीत बनवा वर्षभर टिकणारी दही मिरची, जेवणात तोंडी लावण्यासाठी चमकचमीत पदार्थ
सकाळच्या नाश्त्यात हेल्दी पदार्थ हवा आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये स्वादिष्ट अन् पौष्टिक बीट सँडविच