यंदाच्या वाळवणीत बनवा वर्षभर टिकणारी दही मिरची
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वच घरांमध्ये वाळवणाचे पदार्थ बनवले जातात. पापड, कुरडया, लोणचं, फेण्या इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ पावसाळ्यासह इतर दिवसांमध्ये देखील खाल्ले जातात. संध्याकाळच्या जेवणात सगळ्याच चमचमीत पदार्थ लागतात. तोंडी लावण्यासाठी चटणी, लोणचं किंवा दही मिरची इत्यादी पदार्थ बनवले जातात.या पदार्थांचे सेवन केल्यामुळे जेवणात चार घास जास्त जातात. त्यामुळे अनेक लोक रोजच्या जेवणात लोणचं, पापड किंवा वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेल्या चटणीचे सेवन करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये वर्षभर टिकणारी दही मिरची कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने मिरची बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. बाजारातील बऱ्याच दुकानांमध्ये दही मिरच्या उपलब्ध असतात. पण बाजारात मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा घरी बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. बाजारातून आणलेली मिरच्यांची पाकीट लागेल संपून जातात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला घरामध्ये वर्षभर पुरतील अशा दही मिरच्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दही मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
जेवणात चार घास जातील जास्त! उन्हाळ्यात हिरव्यागार कैरी बोरांपासून बनवा चविष्ट आंबटगोड चटणी