Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सोयाबीन खिमा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 27, 2026 | 10:26 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत नेमके काय पदार्थ बनवावे? असा प्रश्न सर्वच महिलांना कायम पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेला सोयाबीन खिमा अतिशय उत्तम पर्याय आहे. प्रत्येक स्वयंपाक घरात सोयाबीन कायमच उपलब्ध असतात. सोयाबीनपासून विविध पदार्थ बनवले जातात. सोयाबीनमध्ये प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक महत्त्वाचे पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. याशिवाय सोयाबीनच्या खिम्यापासून पराठ्याचे सारण, कटलेट, सँडविच, पुलाव, रोल इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. योग्य मसाले आणि पौष्टिक भाज्या टाकून बनवलेला सोयाबीन खिमा चवीला अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

साहित्य:

  • सोयाबीन
  • पाणी
  • दही
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • तेल
  • आलं लसूण पेस्ट
  • कांदा
  • टोमॅटो
  • लिंबाचा रस
घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

कृती:

  • सोयाबीन खिमा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात सोयाबीन घालून २ ते ३ तासांसाठी भिजत ठेवा किंवा जास्त वेळ नसल्यास गरम पाण्यात टाकल्यास सोयाबीन लगेच भिजले जातील.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले सोयाबीन घालून जाडसर बारीक वाटून घ्या. जास्त पातळ किंवा बारीक पेस्ट करू नये.
  • वाटीमध्ये बारीक केलेला सोयाबीन, दही, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो घालून लालसर मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
  • कांदा टोमॅटो शिजल्यानंतर तयार केलेले मिश्रण ओतून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा. सोयाबीन लगेच शिजतात. त्यामुळे जास्त पाणी घालू नये.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेला सोयाबीन खिमा. हा पदार्थ तुम्ही नुसताच सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make soybean kheema at home simple food recipe soybean kheema recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
1

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
2

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
3

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
4

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.